Mahesh Gaikwad
आजकाल अनेकजण आरोग्याप्रती जागरूक झाल्याचे पाहायला मिळते. निरोगी आरोग्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
मात्र, धकाधकीच्या जीवनात वेळेवर जेवण करण्यासाठीसुध्दा अनेकांना वेळ मिळत नाही. परिणामी अन्न शिळे झाल्याने ते फेकून द्यावे लागते.
आज आपण घरात शिळ्या राहिलेल्या चपात्या खाल्ल्याने आरोग्यासाठी काय-काय फायदे होतात, याची माहिती पाहणार आहोत.
शिळ्या चपात्या खाणे मधुमेह आणि पचनासंबंधित समस्यांनी ग्रस्त असणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहेत.
शिळी चपाती खाल्ल्याने इन्सुलिन स्पाईक होत नाही, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.
तसेच पोटाशी संबंधित बध्दकोष्ठ, पोट फुगणे आणि गॅस होणे अशा समस्यांवरही शिळी चपाती खाणे फायदेशीर आहे.
शिळी चपाती पचनासाठी खूप फायदेशीर अन्न मानले जाते. परंतु केवळ १०-१२ तास शिळी असणारीच चपाती खावी, त्यापेक्षा जास्तवेळ शिळी चपाती खाणे टाळावे.
१०-१२ तासांमध्ये चपातीमधील रेझिस्ंटस स्टार्च वाढतो, जो फायदेशीर असतो. ही बातमी माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.