Sanjana Hebbalkar
आतापर्यंत आपण बदाम खाण्याचे अनेक फायदे पाहिले आहेत. बदाम खाल्याने बुद्धी तल्लख होते असं मानलं जातं
याशिवाय देखील बदामाचे अनेक फायदे आहेत. बदामामध्ये फायबर, प्रथिनांचा समृद्ध घटक आहे.
यामधले हे जे प्रमुख घटक आहे. त्यामुळे शरीरातील उर्जा उत्पादन, पेशींची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
बदामामध्ये भरपूर ई-व्हिटॅमिन असतं. त्यामुळे बदाम खाल्याने या व्हिटॅमिनची पातळी वाढते आणि तुमच्या पेशींमधला कोलेस्ट्राॅल वाढण्यापासून रोखतात.
बदाम भिजवून खाल्यामुळे आपलं शरीर थंड ठेवण्याचा काम करतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि पोटांच्या समस्यांपासून आपल्याला दूर ठेवतात
बदामामध्ये खूप प्रथिने असतात. त्यातही बदाम भिजवून खाल्यासं यामुळे भूक जास्त लागत नाही आणि यामुळे आपल्याकडून अतिरिक्त पदार्थ खाल्ले जात नाही. परिणामी वजन कमी होतं.
भिजवलेल्या बदामामध्ये मोठ्या प्रमाणाक कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे घटक असतात. जे तुम्हाला तुमची हाडे मजबूत करण्यास मदत करतात