Team Agrowon
जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील हिम आवरण वेगाने नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे २०३० पर्यंत आर्क्टिक महासागर आणि लगतच्या प्रदेशात पूर्णपणे हिममुक्त उन्हाळा अवतरू शकतो.
आर्क्टिक महासागरात पूर्णपणे हिममुक्त उन्हाळा होवू शकतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
जर्नल नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
दक्षिण कोरियातील ‘पोहांग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’मधील येऊन-ही- किम यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले होते.
काही संशोधकांनी येत्या दहा वर्षांमध्ये पूर्णपणे हिममुक्त आर्क्टिक प्रदेश अवतरू शकतो असे भाकीत वर्तविले होते.
मात्र, सध्या होणारे हरित गृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण लक्षात घेता ही प्रक्रिया खूप आधीच पूर्ण होईल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
मागील काही दशकांपासून आर्क्टिक महासागरातील बर्फ खूप वेगाने वितळू लागला असून साधारणपणे २००० पासून ही प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याचे दिसून येते.