Team Agrowon
लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर लोहगड किल्ला पावसाळ्यात पर्यटकांचा आकर्षक ठिकाण आहे.
या किल्लावर जात असताना लोणावळा-पवनानगर मार्गावर डोंगरात दुधिवरे खिंड आहे.
ही खिंड अतिशय अरूंद असून, मागील काही वर्षापासून अत्यंत धोकादायक बनली आहे.
किल्ल्यावर जात असताना पावसाळ्यात खिंडीतील सुट्टे दगड-गोटे, छोटी मोठी झाडे आणि ढिसूळ मुरूम, मातीची दरड रस्त्यात कोसळत असतात.
खिंडीच्या सुरुवातीला असलेला मोठे झाड धोकादायक बनले असून रस्त्याच्या दोन्ही बाजू खचल्या आहेत.
अनेक वर्षांपासून या खिंडीच्या दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुधिवरे खिंड धोकादायक बनली आहे.
खिंडीचा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत असून, लोणावळा-पवनानगर-पौड रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे.