Dry Skin Care : ड्राय स्किनमुळे त्रस्त आहात? विसरूनही करू नका 'या' नेहमीच्या चुका

Anuradha Vipat

सामान्य समस्या

त्वचा कोरडी पडणे ही एक सामान्य समस्या आहे, विशेषतः हवामानातील बदलांमुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे हा त्रास जास्त जाणवतो.

Dry Skin Care | agrowon

खालील गोष्टी

जर तुमची त्वचा सतत कोरडी होत असेल, तर खालील गोष्टी करणे त्वरित टाळा.

Dry Skin Care | Agrowon

गरम पाण्याने अंघोळ

खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि खडबडीत होते.

Dry Skin Care | Agrown

कडक आणि सुवासिक साबण

ज्या साबणामध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स, सेंट किंवा कडक अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, ते त्वचेचा ओलावा हिरावून घेतात.

Dry Skin Care | agrowon

मॉइश्चरायझर न लावणे

अंघोळ झाल्यानंतर त्वचा पूर्ण कोरडी होण्याची वाट पाहू नका. त्वचा किंचित ओलसर असतानाच जाडसर मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावा.

Dry Skin Care | Agrowon

कमी पाणी पिणे

केवळ वरून क्रीम लावल्याने त्वचा सुधसरत नाही, तर शरीराला आतून हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्या.

Dry Skin Care | agrowon

ओले असताना त्वचा जोरात घासणे

अंघोळीनंतर टॉवेलने त्वचा जोरात घासून पुसू नका. यामुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात आणि कोरडेपणा वाढतो.

Dry Skin Care | Agrowon

Horoscope 13 October 2026 : आजचा दिवस मेहनतीचा असेल आणि आरोग्याच्या तक्रारी कमी होतील

Horoscope 13 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...