Anuradha Vipat
नितळ आणि चमकदार त्वचेसाठी बीटरूट-गाजर-आवळा ज्यूस हे सर्वात प्रभावी घरगुती पेय मानले जाते.
कोणतीही महागडी क्रीम्स लावण्यापेक्षा आतून पोषण मिळाल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.
हा ज्यूस रक्ताभिसरण सुधारतो, शरीर डिटॉक्स करतो आणि त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो.
सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि १ चमचा मध टाकून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि मुरुमांची समस्या कमी होते.
रात्री १ चमचा चिया सीड्स पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाकून प्या. यातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड्समुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते.
दिवसातून एकदा ताजे नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात आणि कोरड्या व निस्तेज त्वचेला त्वरित तजेला मिळतो.
रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्यायल्याने रात्रभरात त्वचेच्या पेशींची दुरुस्ती होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.