Sainath Jadhav
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पचनशक्ती सुधारते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या १५-२० मिनिटं आधी लिंबू पाणी प्या. यामुळे भूक नियंत्रित राहते, जास्त खाणं टाळलं जातं. अन्न पचायला मदत होते.
व्यायाम करण्यापूर्वी किंवा नंतर लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. व्यायामानंतर शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
झोपायच्या १-२ तास आधी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने शांत झोप लागते आणि शरीर साफ होतं.
लिंबू पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी व चमकदार राहते, वजन नियंत्रणात राहते आणि पोट साफ होऊन बद्धकोष्ठता कमी होते.
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा किंवा पूर्ण लिंबाचा रस, थोडं मध किंवा चिमूटभर मीठ घालून चांगलं मिसळा आणि लगेच प्या.
जास्त आंबट लिंबू पाणी टाळा, दात घासण्याआधी थांबा आणि जळजळ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.