sandeep Shirguppe
भारत सरकारडून आधार कार्ड प्रमाणित केल्यापासून रेशनकार्डाचे महत्व फक्त शिधा घेण्यापुरते राहिले आहे. परंतु रेशन कार्ड अद्यापही भारतीय नागरिकांचा महत्वाचा पुरावा मानला जातो.
दरम्यान रेशनकार्ड काढण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ येत असते. याचा सामान्य लोकांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
सरकारने ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सामान्यांची होणारी लूट आणि त्रास वाचणार आहे.
सरकारकडून जारी केलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने निशुल्क स्वरुपात रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता.
अर्ज डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्राच्या http://mahafood.gov.in अधिकृत पोर्टलला भेट द्या, यानंतर होम पेजच्या डाव्या बाजूला दिलेल्या “डाउनलोड” लिंकवर क्लिक करा.
नवीन रेशन कार्डसाठी अर्ज लिंकवर क्लिक करा. अर्जाचा फॉर्म दिसेल, यानंतर जो अर्ज दिला आहे तो भरा, यांनतर तो अर्ज भरून त्याची प्रिंट काढा.
यानंतर उमेदवारांना अर्जासोबत सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडून तहसील कार्यालयातील रेशन कार्ड विभागात हा अर्ज सादर करावा लागेल.
शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वीज बिल, बँक पासबुक, निवासी पुरावा जसे घर भाड्याची पावती, फोटो या कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल.
अर्ज सादर करताना उमेदवारांनी अर्जावर २ रुपये कोर्ट फी स्टँप लावणे बंधणकारक आहे. वरीलपैकी कोणत्याही कागदपत्रांशिवाय सादर केलेला अर्ज अपूर्ण मानला जातो.