Anuradha Vipat
शुद्ध मीठाल कोणतीही एक्सपायरी डेट नसते, म्हणजेच ते कधीही खराब होत नाही.
शास्त्रोक्त दृष्टीने, मीठ हे एक खनिज आहे. त्यामुळे त्यात पाण्याचा अंश नसतो आणि बॅक्टेरिया किंवा बुरशी मीठामध्ये जिवंत राहू शकत नाहीत.
उलट, जुन्या काळापासून अन्नपदार्थ टिकवण्यासाठी मीठाचा वापर नॅचुरल प्रिजर्व्हेटिव्ह म्हणून केला जातो.
आपण रोज जेवणात जे पांढरे आयोडाईज्ड मीठ वापरतो, त्याला साधारण ५ वर्षांची एक्सपायरी असते.
मीठ खराब होत नाही, पण त्यामध्ये वरून टाकलेले 'आयोडिन' ५ वर्षांनंतर हळूहळू कमी होऊ लागते किंवा उडून जाते. आयोडिन उडून गेल्यानंतरही ते मीठ खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असते.
ज्या मीठामध्ये इतर मसाले, औषधी वनस्पती किंवा लिंबाचा रस मिक्स केलेला असतो, ते मीठ त्यातील इतर पदार्थांमुळे ठराविक काळानंतर खराब होऊ शकते.
जरी मीठ खराब होत नसले, तरी ते उघडे राहिल्यास हवेतील ओलावा शोषून घेते