Mahesh Gaikwad
अनेकजणांना मांसाहारी पदार्थांचे शौकीन असतात. मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात, असे मानले जाते.
मात्र, मांसाहारामुळे शरीराला नुकसान होते, असे मानणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मांसाहारामुळे मधुमेहाचा धोका वाढतो का? याचीची माहिती आपण पाहणार आहोत.
अलिकडेच झालेल्या एका संशोधनातून मांस खाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रक्रिया केलेल्या आणि लाल मांसामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे.
दररोज १०० ग्रॅम प्रक्रिया केलेले लाल मांस खाण्यामुळे मधुमेहाचा धोका १० टक्क्यांनी वाढतो, असे या अभ्यासात समोर आले आहे.
कँब्रिज विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या या संशोधनातून प्रक्रियायुक्त आणि लाल मांसाच्या संबंधित या बाबी समोर आल्या आहेत.
या संशोधनातून लाल मांसामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो, असे पुरावे मिळाले आहेत. शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही, त्यावेळी टाईप-२ मधुमेह होतो.
या आधीही लाल मांसाच्या संबंधित अनेक प्रकारचे संशोधन पुढे आले आहेत. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.