sandeep Shirguppe
मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे आणि घरगुती उपाय केले जातात.
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार सदाफुलीचे रोप मधुमेह नियंत्रात ठेऊ शकतो.
रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी सदाफुली वनस्पतीचे पानं आणि फुलांपासून बनवलेले उपाय वापरले जातात.
सदाफुलीचे कवळे आणि हिरवे पानं स्वच्छ करून सकाळी चघळावे. थोड्यावेळाने पाणी प्यावे.
तुम्ही सदाफुलीच्या पानांची पावडर करून देखील सेवन करू शकता. यासाठी पान स्वच्छ दुवून उन्हात वाळवून खाऊ शकता.
सदाफुलीचे पानं आणि फुलं स्वच्छ धुवावे. नंतर थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे. रोज सकाळी या रसाचे सेवन करावे.
सदाफुलीचे पाने आणि फुलांमध्ये शरीरातील जळजळ कमी करणारे घटक असतात.
सदाफुलीच्या पानांच्या सेवनाने शरीरातील वातदोष कमी होतो, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या समस्या कमी होतात.