sandeep Shirguppe
गोवा सीमेवर असलेला दूधसागर धबधबा हा अतिषय प्रसिद्ध आहे. अभिनेता शाहरूख खानने या धबधब्यावर शुटींग केल्यानंतर याची क्रेझ आणखी वाढली होती.
दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडोवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे.
हा धबधबा मडगाव-बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला ४६ किमी आणि बेळगावच्या दक्षिणेला ८० किमी अंतरावर आहे.
धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.
पावसाळा सुरू असताना जुलै, ऑगस्ट या महिन्यात धबधब्याला गेल्यास मनमोहून टाकणारे निसर्ग तुम्हाला पहायला मिळू शकतो. हा धबधबा बराच प्रसिद्ध असल्याने हजारो पर्यटक येत असतात.
धबधबा अभयारण्यात असल्याने तुम्हाला जायचं असेल तर पहिल्यांदा वन खात्याची परवानगी घ्यावी लागेल. यानंतर तुम्हाला पायी जाण्याचा मार्ग आहे.
धबधब्यापसून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कॅसलरॉक म्हणून आहे. या स्थानकापर्यंत रस्त्याने तुम्हाला जाता येते.
दरम्यान धबधब्याच्या आसपास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची कुठेही सोय नाही. तसेच तिथे मोबाईल सिग्नलही मिळत नाही आणि रस्त्यानेही तिथपर्यंत पोहोचता येत नाही.
दूधसागर धबधबा ट्रेकिंगचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. कॅसलरॉक स्टेशनपासून धबधब्यापर्यंतचे अंदाजे २१ किमीचा ट्रेक प्रवास आहे. तुम्हाला धबधब्याच्या पायथ्याशी एक दिवसाचा मुक्काम करता येतो.
पावसाळ्यात दुधसागर धबधब्याजवळ अनेक चित्रपटांचे शूटींग झाले आहे. याचबरोबर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या चेन्नई एक्सप्रेसचे जोरदार शूटींग झाले होते.