Sainath Jadhav
आलं सूज कमी करतं आणि डोकेदुखीवर फायदेशीर असतं. १ चमचा आल्याचा रस आणि १ चमचा मध एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्या.
पुदिन्याचं तेल डोक्याला थंडावा देतं आणि रक्तप्रवाह सुधारतं.
कपाळावर आणि मानेवर २–३ थेंब लावून मसाज केल्यास काही मिनिटांत आराम मिळतो.
लैव्हेंडरचा सुगंध मनाला शांती देतो आणि तणावाने होणारी डोकेदुखी कमी करतो. २-३ थेंब लैव्हेंडर तेल उकळत्या पाण्यात टाकून वाफ घ्या किंवा झोपताना उशाजवळ ठेवा.
पाणी कमी प्याल्यास डोके दुखू शकते. दर २ तासांनी एक ग्लास पाणी प्या, खासकरून उन्हाळ्यात जास्त लक्ष द्या.
आल्याचा चहा शरीरासाठी फायदेशीर आहे. गरम पाण्यात आलं उकळवा, हवं असल्यास मध घालून प्या.
अपुरी झोप मुळे डोके दुखू शकतं. दररोज ७-८ तास झोप घ्या आणि झोपण्याआधी मोबाईल वापर टाळा.
जर डोकेदुखी कायमस्वरूपी असेल, दृष्टी धूसर होत असेल, उलटी होत असेल – तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.