Team Agrowon
पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचंं शुक्रवारी सकाळी श्री संत सोपान काकांच्या सासवड नगरीचा निरोप घेतला.
ऊन माऊलींच्या सोहळ्याने कुलदैवत खंडेरायाच्या तीर्थक्षेत्र जेजुरीकडे प्रस्थान ठेवले.
सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात करण्यात आले
यावेळी माऊलींच्या पालखीवर भांडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करण्यात आली.
सोहळ्यात भंडाऱ्याची मुक्त उधळण होताना खंडेरायाचे सोनपिवळे लेणं अंगावर घेऊन वैष्णव बांधव नाचत गात तल्लीन झाले होते.
सायंकाळी ६ वाजता समाज आरतीने दमला भागला वैष्णव सोहळा जेजुरीत शिव चरणी विसावला.
दररोजच्या अबीर बुक्क्यात न्हाऊन निघणारा पालखी सोहळा जेजुरी मुक्कामी पिवळ्याजर्द भंडाऱ्यात न्हाऊन निघाला.
शनिवारी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता सोहळा पंढरीकडे मार्गक्रमण करीत आहे.