दिवाळी भेट....

Amit Gadre

किमान एक ते दीड किलोमीटर अंतराची पायऱ्या आणि लोखंडी शिडीची उभी चढण, पुढे परत अर्धा किलोमीटरची वाट आणि डोक्यावर ओझे हे किमान २५,३० जणीचे रोजचे जीवन आहे. त्याच्या या कष्टकरी जीवनातून संध्याकाळी डोंगरी वाडीवस्त्यांमध्ये चूल पेटते.

Amit Gadre | Agrowon

असे आहे भारवाही महिलेचे दैनंदिन जीवन. आज आंबा गावातील प्रयोगशील शिक्षक राजेंद्र लाड यांच्यामुळे विशाळगडावरील भारवाही महिलांना दिवाळी फराळ देण्याचा योग आला.

Amit Gadre | Agrowon

दिवसाची सुरुवात आनंददायी झाली.सरांमुळे या महिलांचे जीवन आणि परिस्थितीसोबत झगडणे समजले.

Amit Gadre | Agrowon

हा उपक्रम राबविण्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे कोल्हापुरातील कांचनताई परुळेकर यांचा.अनेक ग्रामीण भागातील गरजू महिलांना ताईनी उभे केले आहे.

Amit Gadre | Agrowon

त्यांच्या डाॅ.व्ही.टी.पाटील फाऊंडेशनने किर्लोस्कर ऑईल इंजिनसच्या सहकार्याने विशाळगडावर पर्यटकांचे सामान वाहून नेणाऱ्या भारवाही महिलांच्या जीवनात दिवाळीचा आनंद पेरण्याची मला संधी मिळाली.

Amit Gadre | Agrowon

दिवाळी भेट मध्ये एक पिशवीतून टाॅवेल, कंगवा,बटवा,साबण, ऊटणे, पणत्यासह दिवाळी फराळ या भारवाहकांना संस्थेने पाठवला होता, तो आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचविला...

Amit Gadre | Agrowon

दादा, लई बरं वाटलं बघा..हे महिलांचे शब्द आणि डोळ्यांतील समाधान, हीच मला मिळालेली दिवाळी भेट.

Amit Gadre | Agrowon
cta image | Agrowon