sandeep Shirguppe
सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढल्याने काही भाज्यांचे दर उतरले आहेत. टोमॅटो, वांगी, दोडका स्वस्त तर गवारी मात्र भडकली आहे.
जुलै माहिन्यात पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक घटली होती. परिणामी दर भडकले होते. त्यामुळे अनेकांनी जेवणातून काही भाज्या गायब झाल्या होत्या.
दरम्यान श्रावण सुरू असल्याने मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. यामुळे दरात घसरण झाल्याने शेतकरी मात्र अस्वस्थ झाला आहे.
मागचे दोन महिने टोमॅटोला चांगला दर होता. परिणामी, उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, आता आवक वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले आहेत.
किरकोळमध्ये १५० ते १७० रुपये भाव घेणारा टोमॅटो सध्या ३५ ते ४० रुपये झाला आहे.
१३० ते १४० रुपये किलो विक्री होणारी वांगी ४० ते ५० रुपये किलोवर आली आहेत.
दोडका ७० ते ८० वरून ३० ते ४० वर रुपयांनी विक्री होत आहे. बाजारात आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याला भाव आला आहे. किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावल्याने दर कमी झाले आहेत.