Pickle Making : भारतीय लोणच्याचे विविध प्रकार

Team Agrowon

शरीरातील क्षारांचे प्रमाण भरून काढण्यासाठी लोणचे महत्त्वाची भूमिका पार पाडते. विविध प्रकारची फळे, भाजीपाला, मसाले इ. लोणच्यातील अविभाज्य घटक असतात.

Pickle Making | Agrowon

लोणच्यामध्ये मीठ आणि शिरका वापरला जातो. यामध्ये सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मूळ फळ किंवा भाज्यांचे नियंत्रित प्रमाणात किण्वन केले जाते. त्यामुळे लोणच्याला एक विशिष्ट चव आणि स्वाद असतो.

Pickle Making | Agrowon

भारतामध्ये विविध प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. विविध प्रकारची फळे आणि भाजीपाला प्रत्येक हंगामात उपलब्ध असतो, त्यामुळे विविध प्रकारची लोणची फळे आणि भाज्यांच्या हंगामानुसार तयार करतात.

Pickle Making | Agrowon

विविध राज्याच्या आवडी निवडीनुसार आणि चवीनुसार लोणचे तयार करण्याच्या पद्धती आहेत.

Pickle Making | Agrowon

उत्तर भारतामध्ये मुळा, गाजर, फ्लॉवर, आले आणि मिरची लोणचे तयार करतात. परिरक्षक म्हणून मोहरी तेलाचा वापर करतात.

Pickle Making | Agrowon

दक्षिण भारतात कोथिंबीर, लसूण, आल्याचे लोणचे लोकप्रिय आहे. लोणच्यामध्ये तिळाचे तेल वापरले जाते.

Pickle Making | Agrowon

महाराष्ट्रात आंबा, मिरची, मिश्र लोणचे, लिंबू, आवळा, करवंद इत्यादी लोकप्रिय प्रकार आहेत. यामध्ये शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला जातो.

Pickle Making | Agrowon