Butterfly : छान किती दिसते फुलपाखरु! अळीपासून फुलपाखरु कसे तयार होते?

Team Agrowon

सुंदर, आकर्षक दिसणाऱ्या फुलपाखराला डोके, पोट आणि छाती हे अवयव असतात.

Butterfly | Agrowon

फुलपाखराला दोन पंख आणि मिशा असतात. अॅन्टेना म्हणजेच मिशानी फुलपाखरे वास घेतात तर पायाने चव ओळखतात.

Butterfly | Agrowon

जातीनूसार फुलपाखराचे होस्ट प्लॅम्ट ठरलेले असतात. विशिष्ट जातींची फुलपाखरे ही का विशिष्ट प्रकारच्या झाडांवर अंडी घालतात.

Butterfly | Agrowon

 फुलपाखराची मादी मिलनानंतर होस्ट प्लॅन्टवर अंडी घालते.

Butterfly | Agrowon

अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडते.

Butterfly | Agrowon

अळी म्हणजेच सुरवंट खूप खादाड असतो. हा सुरवंट कोवळी पाने, कळ्या अणि फुले अतीशय भरभर खातो.

Butterfly | Agrowon

काही सुरवंट किडी मुंग्यांच्या अळ्या खातात. खाऊन खाऊन सुरवंटाचा आकार मोठा होत जातो. 

Butterfly | Agrowon

सुरवंटाची वाढ पूर्ण झाली की तो एका जागी सुस्त होऊन स्थिर होऊन स्वत:भोवती कोष तयार करतो.

Butterfly | Agrowon

सुरवंट कोषात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. काही दिवसानंतर फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते.

Butterfly | Agrowon