Mahesh Gaikwad
आयुर्वेदीक उपचारांमध्ये मधाला अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक आयुर्वेदीक औषधांच्या चाटणामध्ये मधाचा उपयोग केला जातो.
वजन कमी करण्यापासून ते खोकल्यापासून आराम मिळावा, यासाठी अनेकजण मध खातात. मध खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
खाण्यापिण्याच्या प्रत्येक पदार्थाला एक ठराविक मुदत असते. पण मधाला एक्सपायरी डेट असते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
आपल्या विशिष्ट चवीमुळे मध खायला सर्वांनाच आवडते. आयुर्वेदामध्ये मधाचे विविध फायदे सांगितले आहेत.
एका संशोधनातून असे समोर आले आहे की, मध कधीही खराब होऊ शकत नाही.
तर काही संशोधनातून असे समोर आले आहे की, मध एका वर्षांपर्यंत खराब होत नाही.
दिर्घकाळ मध साठवून ठेवल्यास काळा पडतो. पण मग असा काळा पडलेला मध खावा की नाही, हा सुध्दा प्रश्न असतो.
राष्ट्रीय मध मंडळाच्या मते, योग्य रितीने साठवणूक केलेले असेल, तर असा मध वर्षानुवर्षे खाऊ शकतो.
योग्य पध्दतीने साठवेलेल्या मधाची वर्षानुवर्षे चव बदलत नाही, असेही संशोधनातून समोर आले आहे.