Anuradha Vipat
धनत्रयोदशी हा सण दिवाळीचा पहिला अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो.
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. हा सण समृद्धी, संपत्ती आणि उत्तम आरोग्याचा संदेश घेऊन येतो.
यंदा धनत्रयोदशी तिथी दोन दिवस ६ आणि ७ नोव्हेंबर असली, तरी प्रदोष व्यापिनी तिथीनुसार मुख्य धनत्रयोदशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी केले जाईल.
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी याच दिवशी भगवान धन्वंतरी हातामध्ये 'अमृताचा कलश' घेऊन प्रकट झाले होते.
भगवान धन्वंतरी विष्णूचे अवतार, आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्याचे देव मानले जातात. म्हणूनच या दिवसाला 'धन्वंतरी जयंती' किंवा 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' म्हणूनही साजरे केले जाते.
लक्ष्मी माता ही धन-वैभवाची देवी आहे तर कुबेर देव हे स्वर्गाच्या संपत्तीचे रक्षक आहेत. या दिवशी त्यांची पूजा केल्याने घरात कधीही आर्थिक चणचण भासत नाही.
या दिवशी संध्याकाळी यमराजासाठी घराबाहेर दिवा लावला जातो. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे अकाली मृत्यू किंवा अपघातांपासून रक्षण होते.