Mahesh Gaikwad
नैसर्गिकरित्या उगवणारा गावरान आंबा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने आमरायांचे प्रमाणही कमी होत आहे.
आमराया नष्ट होत चालल्याने गावरान आंब्यांच्या आमरसाची चवही दुर्मिळ झाली आहे.
पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर नैसर्गिकरित्या लागवड केलेल्या गावरान आंब्याची पाच-पन्नास तरी झाडे असायची.
मात्र, अलिकडच्या काळात गावरान झाडांऐवजी संकरित आणि कलम केलेल्या विविध जातींच्या आंब्याची लागवड केली जात आहे.
परिणामी ग्रामीण भागात आता गावरान आंब्यांचा गोडवा दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे. क्वचितच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याची झाडे नजरेस पडताना दिसतात.
शेंद्र्या, शेप्या, गोटी, दश्या, आदी नावाने ओळखली जाणारी गावरान आंब्याची झाडे आणि आमराया दुर्मिळ होत आहेत.
पूर्वी खेड्यात एकमेकांच्या घरी आंबे देण्याची पद्धत होती. खेड्यातही ती अलीकडे राहिलेली दिसत नाही.