Team Agrowon
अनेक वेगवेगळ्या ड्रायफ्रुटस शरीरासाठी प्रचंड फायद्याची मानली जाते. त्यातीलच एक फ्रुट म्हणजे खजूर.
खजूरांसाठी दुबई प्रसिद्ध आहे. दुबईतील खजूर आणि महागड्या खजुरांबद्दल खूप चर्चा होत असते.
आता या दुबईच्या खजुरांची जागा राजस्थानी खजुरांनी घेतली आहे. आता राजस्थानच्या शेतकऱ्यांनी खजूरांची लागवड सुरु केली आहे.
राजस्थानातील या खजुरीला परदेशातही मागणी आहे. हा जो राजस्थानमधला खजूर आहे तो आखाती देशांच्या खजूरांपेक्षा स्वस्त आहेत
अरबचे खजूर चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे आजा राजस्थानच्या या खजूराची चवही त्यांच्यापेक्षा चांगली आहे.
राजस्थानातील या खजुरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रासायनिक मुक्त पद्धतीने वाढवल्या जातात आणि शिजवल्या जातात.
हे खजूर फिनिक्स डॅक्टीलिफेरा या प्रजातीच्या आहेत. त्यामुळे त्या रसायनांशिवाय सहज शिजतात शिवाय आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.