Anuradha Vipat
दसऱ्याच्या सुवर्ण मुहूर्तावर जर तुम्हाला गर्दीत उठून दिसायचे असेल आणि एक परिपूर्ण मराठमोळा रॉयल लूक हवा असेल, तर साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
यंदाच्या दसऱ्याला तुम्ही कोणत्या प्रकारच्या साड्या नेसू शकता, याच्या ५ सर्वोत्तम ट्रेंडी साड्यांच्या फॅशन आयडियाज खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी दसऱ्याच्या पूजेसाठी पहिली पसंती असते. तिचे भरगच्च रेशमी काठ आणि पोपटाचे किंवा मोराचे नक्षीकाम असलेला पदर तुम्हाला अत्यंत रॉयल लूक देतो.
दसऱ्याला शस्त्रांची आणि वाहनांची पूजा करताना किंवा दारी तोरण लावताना नऊवारी साडी नेसल्यास एक वेगळाच उत्साह आणि रुबाब येतो.
जर तुम्हाला साडीमध्ये खूप भारी आणि चकचकीत लूक हवा असेल, तर बनारसी सिल्क उत्तम पर्याय आहे.
सध्या फॅशन वर्ल्डमध्ये टिश्यू सिल्क साड्यांचा प्रचंड ट्रेंड आहे. या साड्या वजनाला अत्यंत हलक्या असतात आणि यांचा लूक अतिशय आधुनिक व क्लासी दिसतो.
जर तुम्हाला जड साड्या नेसायच्या नसतील आणि साधेपणातच सौंदर्य शोधायचे असेल, तर फ्लोरल किंवा बॉर्डरवर फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेली ऑरगॅंझा साडी निवडा.