Dairy Farming : दुग्धव्यवसाय ठरला कुटुंबाचा आधार

Team Agrowon

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पिंपळगाव कुटे गाव आहे. पूर्णा नदीकाठची खोल काळी कसदार सुपीक जमीन गावाला लाभली आहे. येथील अनेक शेतकरी दुग्धव्यवसायात आहेत.

Dairy Farming | Manik Raswe

यापैकीच सोनाजी आहेर हे एक शेतकरी. सोनाजी यांनी २०१-११ मध्ये संकरित जर्सी गाय घेऊन दुग्ध व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

Dairy Farming | Manik Raswe

दुग्धोत्पादनात सरस आणि भाकड काळ कमी असल्यामुळे होल्स्टिन फ्रिजियन (एचएफ) जातीच्या गायींच्या संगोपनावर भर देण्याचे ठरविले.

Dairy Farming | Manik Raswe

सोनाजी यांच्या गोठ्यात आज लहान मोठ्या अशा ३० गायी आहेत. या गायींसाठी त्यांनी मुक्त संचार पद्धतीचा गोठा तयार केला आहे.

Dairy Farming | Manik Raswe

गायींच्या आहारा व्यवस्थापनाकडे सोनाजी यांनी विशेष भर दिला आहे. यासाठी त्यांनी दीड एकरावर सुपर नेपियर गवताची लागवड केली आहे.

Dairy Farming | Manik Raswe

याशिवाय नेपियर गवत आणि उसापासून मुरघास निर्मिती होते. त्यामुळे पौष्टिक चारा उपलब्ध होतो. सरकी पेंड, खुराक, भरडधान्याचा भरडा खुराक म्हणून दिला जातो.

Dairy Farming | Manik Raswe

गायींची संख्या वाढल्याने तसेच ‘हायजेनिक’ दुधासाठी आता मिल्किंग मशिनचा वापर होतो. प्रति दिन दूध उत्पादन ४०० लिटरपर्यंत आहे.

Dairy Farming | Manik Raswe

शासकीय दूध संकलन बंद झाल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. अशा स्थितीत दुधावर प्रक्रिया करण्याचे ठरविले. यंत्र सामग्री खरेदी करून पनीर, खवा, दही आदी पदार्थ तयार करून परभणी, नांदेड येथे विक्री केली जाते.

Dairy Farming | Manik Raswe
Cactus Garden | Dr. Vyankatrao Ghorpade