Cyclone Mocha: शेतकऱ्यांसमोर नवं संकट! चक्रीवादळ 'मोचा'चा धोका

Team Agrowon

पहिले चक्रीवादळ

भारतात या वर्षातील पहिले चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे

Cyclone Mocha | agrowon

बंगालच्या उपसागरावर

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, 9 मे च्या सुमारास बंगालच्या उपसागरावर म्हणजेच BOB वर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Cyclone Mocha | agrowon

उद्यापासून सुरुवात

हवामान खात्याने सांगितले की, 6 मे रोजी हे चक्रीवादळ दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होईल

Cyclone Mocha | agrowon

दाबाचे चक्रीवादळात रूपांतर

दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ मे रोजी चक्रीवादळ पसरू शकते. 8 मे रोजी खोल विस्कळीत होईल. तर 9 मे पर्यंत या खोल दाबाचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते.

Cyclone Mocha | agrowon

या राज्यांमध्ये प्रभाव

पश्चिम बंगालच्या किनारी भागात हे चक्रीवादळ अधिक प्रभावी ठरेल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे

Cyclone Mocha | agrowon

अवकाळी परतत असताना

काही दिवसांवर आलेल्या मान्सूनमुळे लवकरच अवकाळी पाऊस थांबेल असे वाटत असतानाच देशभरात चक्रवादळाचे संकट आले आहे

Cyclone Mocha | agrowon

पुन्हा पावसाची शक्यता 

मोचा चक्रवादळामुळे देशात वादळीवाऱ्यासह पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Cyclone Mocha | agrowon

स्पष्टता नाही

मात्र, त्याचा कुठे परिणाम होईल, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नसल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

Cyclone Mocha | agrowon