Mahesh Gaikwad
कोलेजन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे, जे शरीराच्या वेगवेगळ्या भागात असते. त्वचेच्या आरोग्यासाठी कोलेजन फायदेशीर असते.
वाढत्या वयासोबतच शरीरातील कोलेजन तयार होण्याचे प्रमाणाही कमी होते. ज्यामुळे पुरेशी झोन न होणे, ताणतणाव या सारख्या समस्या होतात.
शरीरातील कोलेजन वाढविण्यासाठी कोणतीही औषधी घेण्यााआधी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
शरीरातील कोलेजन वाढविण्यासाठी कढीपत्त्याची पाने फायदेशीर आहे. यामध्ये असणारे पोषक घटत कोलेजन वाढीसाठी उपयुक्त असतात.
कढीपत्त्यामध्ये व्हिटामिन-सी, अँटी-ऑक्सिडंट या सारखे औषधी घटक असतात. जे त्वेचेच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
कढीपत्त्याची ४-५ पाने सकाळी चावून खाल्ल्यामुळे त्वचा उजळते. तसेच त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होते.
चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूमांच्या समस्या कमी करण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे.
कढीपत्त्यामुळे शरीरातील कोलेजन थेट वाढत नाही. पण कोलेजन निर्मितीसाठी पोषक घटक पुरवतो. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.