Curd Benefits: उन्हाळ्यात रोजच्या आहारात दह्याचा समावेश का असावा? ७ महत्त्वाची कारणे

Deepak Bhandigare

ऊर्जा देणारे सुपरफूड

पचनास हलके, शरीराला ताजेतवाने आणि हायड्रेट ठेवणारे दही हे उन्हाळ्यात आरोग्यदायी असून ते ऊर्जा टिकवून ठेवणारे एक उत्तम सुपरफूड मानले जाते

Curd Benefits In Summer | Agrowon

शरीराला थंडावा

उन्हाळ्यात रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्याने शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा मिळतो

Curd Benefits In Summer | Agrowon

पचनक्रिया सुधारते

दह्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि डिहायड्रेशन आणि ॲसिडिटी यांसारखा उन्हाळ्यात उद्भवणारा त्रास टाळण्यास मदत होते

Curd Benefits In Summer | Agrowon

रोगप्रतिकारकशक्ती वाढवते

दह्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, पोटॅशियम आणि प्रोबायोटिक्ससारखे आवश्यक पोषक घटक असल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते

Curd Benefits In Summer | Agrowon

हाडे आणि दात मजबूत

दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्याने हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते

Curd Benefits In Summer | Agrowon

वजन नियंत्रणात मदत

दह्याचा रोजच्या आहारात समावेश केल्याने वजन कमी होऊ शकते, यात प्रोटिनचे प्रमाण अधिक असल्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहून अतिखाणे टाळता येते

Curd Benefits In Summer | Agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

नियमितपणे दह्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, तसेच यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहू शकतो

Curd Benefits In Summer | Agrowon

त्वचा तजेलदार

दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे मुरुम कमी होऊन त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते

Curd Benefits In Summer | Agrowon
Soaked Raisins Benefits | Agrowon
Soaked Raisins Benefits: उन्हाळ्यात बेदाणे खावेत की नाही?