Aslam Abdul Shanedivan
जिरे खाणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असून अनेक आरोग्याच्या समस्या दूर होतात.
यामध्ये लोह, पोटॅशियम, जस्त आणि कॅल्शियम यांचा समावेश असून पोटॅशियम रक्तदाब आणि हृदय गती नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते.
दररोज ५ ग्राम जिरे खाल्ल्यास पचनतंत्र निरोगी ठेवण्यासाठी मदत मिळते
जिरे खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होऊन रोगशक्ती अधिक बळकट होते
जिऱ्यामुळे मेटाबॉलिज्म वाढून झटपट वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी जिऱ्याचे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते.
दररोज जिरे खाल्ल्याने मधुमेहाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. यातील काही घटकांमुळे मधुमेहाचा प्रभाव कमी होतो.
जिऱ्यामध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असल्याने ते अन्नाशी संबंधित होणाऱ्या संसर्गापासून आपले संरक्षण करते. तसेच अन्नामध्ये वाढणारे बॅक्टेरिया आणि बुरशी रोखतात.