Cultivation: शिवारात सर्जा-राजाची घुंगरं खूळखूळू लागली

Team Agrowon

मशागतीला गती

आज मोगडा मारला. खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीला गती आली आहे.

Cultivation | Sominath Gholwe

मोगडा बसत

पाऊस बऱ्यापैकी झाल्याने ढेकळं ठिसूळ झाले आहेत. त्यामुळे नांगरटीला खूप चांगला मोगडा बसत आहे. तीन फणाची तिफण असते.... जी ढेकळं फोडण्यासाठी वापरतात.

Cultivation | Sominath Gholwe

यांत्रिकीकरणाची शेती परवडेल

सर्व कामे यंत्राने /मशीनने करायला शेतकरी ऐवढा श्रीमंत नाही.... जवळपास 80 ते 85 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक असून कोरडवाहू शेती करणारा आहे. या कोरडवाहू शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाची शेती परवडेल का?

Cultivation | Sominath Gholwe

बैल काळानुरूपाने नाहीसे

आम्ही भावंडे, आईवडील व घरची मंडळी शेतीत राबायचो.रान मोगडायचो, कुळवायचो,कोळपणी,व शेतीची अनेक कामे करायचो. पण आज दुर्दैवाने आमची प्राणी संपत्ती व बैल काळानुरूपाने नाहीसे झाले.

Cultivation | Sominath Gholwe

जनावरांचा लळा

आमच्याकडे गोदावरी नावाची एक गाय होती.पुढे तिला राधा ही कालवड तर हौशा व देशा हे गोरे व त्यांचेच पुढे बैल म्हणून आमच्या गरीबीची परिस्थिती बदलण्यात मोलाचे योगदान होते.या गाईंचा व बैलांचा आम्हाला व आमचा त्यांना खुप लळा व प्रेम होते.

Cultivation | Sominath Gholwe

जनावरांचं प्रेम संपलं?

आमची परिस्थिती नसल्याने आम्ही आजोळात आमचा सांभाळ आजी व आजोबांनी केला.त्यावेळी आम्ही सहा सहा महिने आमच्या गावाकडे जायचो नाही.परंतु जेव्हा कधी जायचो तेव्हा आमचे स्नेही असल्यागत आमची गोदावरी,राधा,हौशा,देशा आम्हाला जवळ जाताच प्रेमाने चाटायचे.

Cultivation | Sominath Gholwe
Livestock | Agrowon