Team Agrowon
दूधात खूप पोषक तत्व असल्याने पूर्वीपासूनच दूधाला मागणी असते. दैनंदिन जीवनात देखील अनेकगोष्टींसाठी दूधाला प्राधान्य दिलं जातं
गायी-म्हशीचं दूधाचं उत्पादन जास्त झाल्यास त्याचा फायदा दूध उत्पादकांना होतो.त्यामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी व्यवसायिक प्रयत्न करत असतात.
संगीतामुळे माणसांना आनंद मिळतो. ताण कमी होते. त्याचप्रमाणे जनावरांना संगीत ऐकवल्यास त्याचा परिणाम गायी आणि म्हशींवरही दिसून येतो.
कर्नालच्या नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात एक आगळावेगळा निष्कर्ष समोर आला आहे. यामध्ये गायी-म्हशींना गाणी ऐकवल्यास त्यांची दूध देण्याची क्षमता वाढते अस समोर आलं आहे.
या अभ्यासासाठी हजारो दुभत्या जनावरांवर संशोधन करण्यात आले. यानंतर असे दिसून आले की संगीत प्राण्यांचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करते.
संगीत ऐकल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमताही वाढते, म्हणजेच गायी-म्हशींना संगीत ऐकवल्यास जास्त दूध मिळते.
हवामान बदलाचा प्राण्यांवर होणारा परिणाम यावर संशोधन केले जात होते.त्याचप्रमाणेसंगीत ऐकल्याने जनावरांवर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
संशोधनातून असं समोर आले की संगीतामुळे गायी आणि म्हशींच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन्स सक्रिय होतात, जे अधिक दूध देण्यासाठी सक्रिय होतात.त्यामुळे त्याचं दूध देण्याचं प्रमाण वाढतं