Team Agrowon
गोमुत्रात मानवी आरोग्यासाठी हानीकारक बॅक्टेरिया असल्यामुळे हे बॅक्टेरिया मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकतात असा धक्कादायक निष्कर्ष या संस्थेने काढला आहे.
संशोधनासाठी स्थानिक डेअरी फार्ममधून साहीवाल, थारपारकर या देशी आणि विंदावाणी या संकरित जातीच्या गायीचे गोमुत्र आणि म्हैस आणि मानवाच्या मुत्राचे नमुने गोळा केले.
जून ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान केलेल्या संशोधनानूसार निरोगी गायी आणि बैलांच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये कमीतकमी १४ प्रकारचे हानिकारक जीवाणू अढळले, ज्यामध्ये एस्चेरिचिया कोलाईचा समावेश आहे, या जिवाणूमुळे पोटात संसर्ग होऊन मानवाला गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.
या संशोधनाचे निष्कर्ष रिसर्चगेट या संशोधन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, भारतीय बाजारपेठेत अनेक पुरवठादारांकडून गोमूत्र मोठ्या प्रमाणावर भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ट्रेडमार्कशिवाय विकले जाते.
आयव्हीआरआयच्या एपिडेमिओलॉजी विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनूसार म्हैस आणि मानवी मूत्राच्या एकूण ७३ नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की म्हशीच्या मूत्रात गोमूत्रापेक्षा बॅक्टेरिया ला रोखण्याची क्षमता जास्त आहे. डिस्टिल्ड म्हणजेच शुद्ध केलेल्या गोमूत्रामध्ये संसर्गजन्य बॅक्टेरिया नसतात असा काही लोकांचा समज आहे.