Team Agrowon
दूध व्यवसाय शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं एक प्रमुख साधन आहे. त्यासाठी मात्र योग्य दूधाचे उत्पादन मिळणं गरजेचं आहे. या तीन प्रमुख जातीच्या गायी तुम्हाला दुधाचं जास्त उत्पादन मिळवून देऊ शकतात.
गीर जातीच्या गायीच्या दुधात भरपूर पोषक असतात. या गायीच्या दुधात जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर पोषक घटक आढळतात.
गीर गाय दररोज १२ ते १५ लिटर दूध देते. या गायीची दूध ६५ रुपये किलो दराने विकले जाते. सरासरी १२ लिटर दूध दिवसाला मिळाल्यास महिन्यास २० हजारांपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो
लाल सिंधी गाईच्या दुधात जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक घटक असतात.
त्यांचे दूध स्नायू, हाडे, दात, रक्त निर्मिती, वाढ आणि मेंदूच्या चांगल्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. ही गाय दररोज १०-१२ लीटर दूध देते.
या जातीच्या गायी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यात मोठी मदत करतात. ही प्रजाती पंजाब आणि हरियाणा राज्यात आढळते.
साहिवाल गाय दररोज सुमारे 15-20 लिटर दूध देते. या गायीची किंमत 40 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे.