Cotton Sowing: कपाशीची योग्य पेरणी आणि अंतर; ३०% उत्पादनवाढीचा सोपा फॉर्म्युला!

Swarali Pawar

उत्पादन वाढवायचंय?

कपाशीमध्ये योग्य पेरणी आणि अंतर ठेवल्यास उत्पादनात मोठी वाढ मिळू शकते. कमी पावसाच्या वर्षात सघन लागवड विशेष फायदेशीर ठरते.

High Yield Cotton | Agrowon

पेरणीची योग्य वेळ

१५ ते ३० जून हा कपाशी पेरणीचा आदर्श कालावधी आहे. मात्र ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.

Sowing Time | Agrowon

पेरणीची खोली

कपाशीचे बियाणे मोठे असल्याने ते ५ ते ७ सेंमी खोलीवर पेरावे. खूप खोल किंवा उथळ पेरणी टाळल्यास उगवण चांगली होत नाही.

Cowing Depth | Agrowon

अंतर का महत्त्वाचे?

योग्य अंतरामुळे रोपांना हवा, प्रकाश आणि अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळतात. यामुळे बोंडधारणा वाढून उत्पादनात भर पडते.

Why Spacing is important | Agrowon

मराठवाड्याची शिफारस

कोरडवाहू शेतीसाठी १२० × ४५ सेंमी अंतर ठेवावे. बागायतीत जमिनीप्रमाणे १५० × ३० ते १८० × ३० सेंमी अंतर योग्य ठरते.

Marathwada Recommendation | Agrowon

विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र

विदर्भात कोरडवाहूसाठी ९० × ४५ किंवा ९० × ६० सेंमी अंतर उपयुक्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात ९० × ६० किंवा ९० × ९० सेंमी अंतराची शिफारस आहे.

Vidarbh & Western Maharashtra | Agrowon

सघन लागवडीचा फायदा

सघन लागवडीत कमी जागेत अधिक रोपे घेतली जातात. यामुळे कपाशीचे उत्पादन सरासरी ३० टक्क्यांनी वाढू शकते.

High Density Panting | Agrowon

संशोधनाचा निष्कर्ष

मध्यम जमिनीत सघन लागवडीमुळे उत्पादनात ४० ते ५० टक्के वाढ दिसून आली. कमी पावसाच्या परिस्थितीत हे तंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Cotton Research Findings | Agrowon

Dharwad Tur Method: धारवाड पद्धतीने तूर लागवड; हेक्टरी २५-२६ क्विंटल उत्पादनाची संधी

अधिक माहितीसाठी..