Cotton Rate: कापसाच्या दरात काहीशी सुधारणा

Anil Jadhao 

कालपासून प्रत्यक्ष खरेदी अर्थात बाजार समित्यांमधील कापूस दरात काही ठिकाणी क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची सुधारणा दिसून आली.

आजही कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

सध्या आर्थिक नड असलेले शेतकरी कापूस विकत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस मागे ठेवला.

देशातील वायदेबाजार अर्थात एमसीएक्सवर कापसाचे जानेवारी आणि त्यापुढील वायदे अद्यापही खुले झाले नाहीत.

वायदे नसताना कापसाचे दर खरंच कमी राहतात का? याची चचपणी सरकार करत असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. 

पण वायदे सुरु झाले नाहीत तरीही जानेवारीत कापसाचे दर वाढू शकतात. शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग केले नाही तर बाजारातील आवक वाढणार नाही.