टीम ॲग्रोवन
पुढच्या काही महिन्यांत कापसाला वाढीव दर (Cotton Market Rate) मिळेल, असं त्यांना वाटतंय.
त्यामुळे त्यांनी कापूस रोखून धरला आहे. शेतकरी कापसाचा मोठ्या प्रमाणावर साठा करत आहेत.
ते टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत. त्यामुळे यंदा उत्पादन (Cotton Production) वाढण्याचा अंदाज जाहीर होऊनही निर्यात मात्र थंडावलेली दिसतेय.Cotton Rate
बाजारात कापसाची आवक वाढत नसल्याने दर चढे आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील किंमतपातळी विचारात घेता भारतीय कापूस महाग पडतोय.
‘ कापसाच्या नवीन पिकाची वेचणी गेल्या महिन्यात सुरू झाली. परंतु शेतकरी माल विकायला उत्सुक नाहीत. गेल्या वर्षीप्रमाणे कापसाला जादा भाव मिळेल, या आशेने त्यांनी माल साठवून ठेवलाय, '' असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले.