sandeep Shirguppe
लांबलेला मान्सून अन् अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पालेभाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत.
दरम्यान पालेभाज्यांना दर चांगला येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काही प्रमाणात चार पैसे पदरात पडत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर देशात मोठ्या शहरात दीडशे ते दोनशे रुपयांच्या आसपास आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना यातून चांगला नफा मिळत आहेत.
टोमॅटो पाठोपाठ आता बाजारात कोंथिबीरला सुध्दा चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग अधिक आनंदात दिसत आहे.
लातूर जिल्ह्यातल्या कोराळी येथील शेतकऱ्याने एका एकरात दोन लाख रुपयांच्या कोथिंबीरीचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची अधिक चर्चा सुरु आहे.
तीन महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल
तीन महिन्याच्या कोथिंबीर पिकाला दोन लाख रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल आता कोथंबीर लागवडीकडे वळला आहे.
कोराळी येथील शेतकरी संजय बिरादार यांना कोथंबीर लागवडीसाठी ३५ हजार रुपये खर्च आला होता. त्यांना आता एकराला दोन लाख रुपयांचा भाव मिळाला आहे.
टोमॅटो उत्पादनात लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या वडवळ-जाणवळ भागातील शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत.
टोमॅटो पिकावर बोकड्या-किडीने आक्रमण केले आहे. त्यामुळे पाने आणि कच्च्या टोमॅटोला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुढील गोष्टी होणार आहेत.