Team Agrowon
सध्या लेट खरीप कांद्याचा खर्च दुप्पट आणि उत्पन्न निम्म्यावर अशीच वाईट परिस्थिती आहे.
कांद्याच्या दराने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
यंदा खरीप व लेट खरीप कांद्याला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यामुळे रोपांचे नुकसान झाले आहे.
त्यातच लागवडीची मजुरी आणि खते-औषधांचा खर्चही वाढल्याचे शेतकरी सांगतात.
लासलगाव बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला किमान ३०० कमाल १२३५ तर सरासरी ५७५ रुपये दर मिळत आहेत.
एकरी पाऊण लाखांचा खर्च केला पण दर नसल्याने ३५ ते ४० हजार रुपये एकरी उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी सांगतात.
दरम्यान, सरकारच्या कांदा धोरणाबाबात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसत आहे.