Anuradha Vipat
पाठदुखी तीव्र असेल किंवा काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
जड वस्तू उचलणे, चुकीची हालचाल करणे किंवा जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने स्नायू आणि अस्थिबंधनांवर ताण येऊ शकतो ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते.
बसताना किंवा उभे असताना शरीराची चुकीची स्थित ठेवल्यास पाठीच्या कण्यावर जास्त ताण येतो ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते.
मणक्याच्या मधील गादी सरकल्यास किंवा फाटल्यास नसांवर दबाव येऊ शकतो ज्यामुळे पाठदुखी होते.
मणक्याच्या कणातील पोकळी अरुंद झाल्यास मज्जातंतूंवर दबाव येतो आणि पाठदुखी होऊ शकते.
सांध्यांची झीज होऊन पाठदुखी होऊ शकते.
अपघात किंवा इतर शारीरिक इजा झाल्यामुळे देखील पाठदुखी होऊ शकते