Team Agrowon
कॅलिफोर्नियाच्या सॅनडिओगो येथे कार्ल्सबॅड रँच हे फुलांचे उद्यान आहे.
येथे ४० एकरांवर रॅननक्युलस फुलांची लागवड करण्यात आली आहे. या फुलांच्या लागवडीला ८५ वर्षांचा इतिहास आहे.
ल्यूथर गेज या फलोद्यान शास्त्रज्ञाने १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला या फुलांच्या लागवडीला सुरूवात केली.
ल्यूथर गेज यांनी या भागात रॅननक्युलस बिया आणल्या. फ्रँक फ्रेझीच्या दक्षिण महासागराच्या बाजूला असलेल्या लहान भाजीपाल्याच्या शेतात त्यांची याची लागवड करण्यास सुरुवात केली.
रॅननक्युलसचे मूळ आशियातील असून याची फुले लाल आणि पिवळ्या रंगाच्या छटामध्ये असतात.
आपण आता पहात असलेल्या फुलांचे सुंदर रंग आणि परिपूर्णता हे एडविन फ्रेझीने अनेक वर्षांपासून केलेल्या मेहनतीचे फळ आहे.
प्रत्येक वसंत ऋतूमध्ये रॅननक्युलस रंगाच्या झगमगाटात फुलत असतात. हे फ्लॉवर फील्ड्स निसर्गाच्या कलात्मकतेचे प्रदर्शन करत आहेत.