Lavang Benefits : लवंगात अनेक आजार दूर करण्याची ताकद, वाचा फायदे

sandeep Shirguppe

आरोग्यासाठी फायदेशीर लवंग

जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबत आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या लवंगाचे अनेक फायदे आहेत. फायबर, जीवनसत्त्वे, खनिजांसह अशी महत्वाची पोषकतत्त्वे असतात.

Lavang Benefits | agrowon

आयुर्वेदात लवंगाला महत्व

विशेषतः यकृताच्या आरोग्यासाठी आणि डायबेटिसमध्ये रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात आणण्यासाठी लवंग हितकारी असते असे आयुर्वेद तज्ज्ञाकडून सांगण्यात येते.

Lavang Benefits | agrowon

भूक वाढण्यास मदत

लवंगामुळे भूक लागते, अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच उलटी होणे, पोटातील गॅस, तोंडातून दुर्गंधी येणे या समस्येवर लवंग खाणे फायदेशीर असते.

Lavang Benefits | agrowon

मेंदूच्या कार्यास वेग

मेंदूचे कार्य आणि हाडे मजबूत होण्यासाठी मँगॅनीजची आवश्यकता असते हेच घटक लवंगामध्ये असतात.

Lavang Benefits | agrowon

स्ट्रेस कमी होतो

लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपले रक्षण होते.

Lavang Benefits | agrowon

मुख दुर्गंधी होत नाही

लवंग खाण्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतो तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत होते. लवंगात असणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ई-कोलाईसारख्या अनेक बॅक्टेरिया नष्ट होतात.

Lavang Benefits | agrowon

कफ पित्त दोष कमी

लवंगमुळे कफ व पित्त दोष कमी होतात, रक्तविकार, श्वासरोग उचकी या त्रासमध्ये लवंग उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

Lavang Benefits | agrowon

पचन क्रिया सुधारते

लवंग खाण्यामुळे भूक वाढण्यास व घेतलेल्या आहाराचे योग्यप्रकारे पचन होण्यास मदत होते. पाण्याबरोबर लवंग बारीक वाटून त्याचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी व मायग्रेनचा त्रास कमी होतो.

Lavang Benefits | agrowon

२ ते ३ लवंग खावे

एका दिवसात प्रौढ व्यक्तीने फक्त 2 ते 3 लवंगा खाव्यात. यापेक्षा अधिक लवंगा खाणे टाळावे.

Lavang Benefits | agrowon

लवंगात भरपूर घटक

एक चमचा किंवा 2.1 ग्रॅम लवंगमधून मॅंगनीज १.२६३ mg, कॅलरीज ६ kcal, प्रोटीन ०.१३ g कार्बोहाइड्रेट -१३८ g फॅट - ०.२७ g फायबर - ०.७ g एवढे घटक मिळतात.

Lavang Benefits | agrowon
ujani dam | Agrowon