MP Shrikant Shinde : मुख्यमंत्री शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे रमले शेता भातात, रोप लावणीत मग्न

sandeep Shirguppe

साताऱ्यात भात लावणीला वेग

सध्या कोकणात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या शेतीचे काम करताना आपण कित्येक वेळा पाहिले असेल.

MP Shrikant Shinde | agrowon

श्रीकांत शिंदे भात लावणीत मग्न

आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी शेतीची कामे केली आहेत. हे दोन दिवस भात लावणीत मग्न झाले आहेत.

MP Shrikant Shinde | agrowon

मशिनच्या सहाय्याने मशागत

दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे श्रीकांत शिंदे शेतीत भात लावणी करताना दिसून आले. आपल्या शेतात त्यांनी मशिनच्या सहाय्याने चिखल केला.

MP Shrikant Shinde | agrowon

तरवा काढण्यासही मदत

याचबरोबर त्यांनी भाताचा तरवा काढण्यासही मदत केली. चिखल करण्यासही ते मदत करताना दिसत आहेत. खासदार शिंदे यांच्यासोबत गावकऱ्यांनीही त्यांना मदतीचा हात दिला.

MP Shrikant Shinde | agrowon

साताऱ्यातील शेतीत श्रीकांत शिंदे रमतात

श्रीकांत शिंदे हे वारंवार आपल्या शेतात येत झाडे लावणे, स्ट्रॉबेरी लागवड, भात शेती यांची कामे अत्यंत आवडीने करत असल्याचे पहायला मिळते.

MP Shrikant Shinde | agrowon

फोटोची जोरदार चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ श्रीकांत शिंदेही मोठ्या उत्साहाने शेतीचे कामे करताना दिसल्याने त्यांच्या फोटोची जोरदार चर्चा होत आहे.

MP Shrikant Shinde | agrowon

यातून उर्जा निर्माण होते

श्रीकांत शिंदे म्हणाले की, भातशेतीत मळ्यात वाढणारी भातरोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते.

MP Shrikant Shinde | agrowon

बळीराजाच्या कष्टाची जाणीव

शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची जाणीव आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती असे खा. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

MP Shrikant Shinde | agrowon

निसर्गाच हे मोठं देणं

निसर्गाचं हे देणं जगण्याचा भाग असणं यापेक्षा वेगळं भाग्य नाही.असे काम केल्यावर पुढील कामात आम्हाला नक्की ऊर्जा मिळते असेही ते म्हणाले.

MP Shrikant Shinde | agrowon

गावपण अनुभवण्याचा आनंद

गुरेवासरे त्यांचा मुकेपणा, त्यांची माया हे सगळे अबोल असते पण तरीही ते खूप बोलके असते. हे गावपण अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आहे.

MP Shrikant Shinde | agrowon
kharif sowing | agrowon