Team Agrowon
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदे हे अनेकवेळा आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी गेले आहे.
कालही मुख्यमंत्री शिंदेंनी ठाण्यातील आपले सर्व कार्यक्रम रद्द करत सहकुटुंब आपल्या मूळगावी गेले आहेत.
गावी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियासोबत वेळ घालवला आहे. यावेळी त्यांनी गावातील शेतीची पाहणी केली.
शेतीची पाहणी करण्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी शेतामध्ये सपत्निक नारळाच्या झाडाची लागवड केली.
मुख्यमंत्र्यानी आपल्या शेतात जवळपास पाच हजार नारळाची आणि केळीच्या झाडांची लागवड केली आहे.
आपल्याला शेतीची आवड असून शेतात आल्यानंतर वृक्षारोपण करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांनीही शिंदे यांना शेतीत मदत करत वृक्षारोपण केले.
दरम्यान, राज्याचा कारभार सोडून मुख्यमंत्री शिंदे शेतात रमल्याने सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे.