Drip Irrigation : ठिबक सिंचन सुरु करण्यापुर्वी या गोष्टी नक्की तपासा

Team Agrowon

ठिबक सिंचन संच व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी पाणी गाळण यंत्रणा आणि त्याची कार्यक्षमता, आवश्यक दाब, दाब तसेच प्रवाह यांचा परस्पर संबंध लक्षात घ्यावा.

Drip Irrigation | Agrowon

योग्य दाबावर ठिबक संच चालवावा.

Drip Irrigation | Agrowon

साधारणपणे उन्हाळ्यामध्ये ३ तास, हिवाळ्यामध्ये २ तास आणि पावसाळ्यात पाऊसमान बघून आवश्यकतेनुसार एक तास ठिबक सिंचन संच सुरू ठेवावा.

Drip Irrigation | Agrowon

आठवड्यातून एकदा संपूर्ण संचाची आणि सर्व फिटिंग व्यवस्थित आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. गरज असेल तिथे लगेच दुरुस्ती करून घ्यावी.  

Drip Irrigation | Agrowon

लॅटरल सरळ रेषेत अंथरलेली असावी. एंड कॅप व्यवस्थित बसविलेली असावी. साधारणपणे दोन महिन्यांतून एकदा तोट्यामधून मिळणारा प्रवाह तपासावा.

Drip Irrigation | Agrowon

व्हेंच्यूरीमधून फक्त पाण्यात विरघळणारी किंवा द्रवरूप खते द्यावीत. खत व पाणी यांचे प्रमाण साधारणत: १:१० असावे.

Drip Irrigation | Agrowon

डिझाइन केलेल्या दाबानुसार फिल्टर इनलेटवर आवश्यक दाब असल्याची खात्री करावी.
 

Drip Irrigation | Agrowon