Team Agrowon
‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली नागपूरातील गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणात ए.एस.ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कंपनीने गुंतवणूकदारांच्या जागेवर पॉलीहाऊस बांधून देण्याचेदेखील आश्वासन दिले होते.
तसेच तांत्रिक मदत करणाऱ्या व्यक्तींचा खर्च व इतर साहाय्यदेखील करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
या प्रकल्पाचा खर्च १.०८ कोटी असून गुंतवणूकदारांना ४० लाखच गुंतवावे लागणार असल्याचा दावा करण्यात आला.
शंभर एकरात निघणारे उत्पादन आम्ही एका एकरात घेतो, असे आरोपींनी त्यांना सांगितले होते.
प्रत्येक वर्षाला १०० टक्के असा १२ वर्ष परतावा मिळेल असे आमिष दाखविण्यात आले.