Team Agrowon
केंद्र सरकारने फूड हबसाठी महाराष्ट्रातील तीन शहरांची निवड करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशातील १०० शहरांची फूड हब या उपक्रमासाठी निवड केली
महाराष्ट्रात नाशिकसह कोल्हापूर व नांदेड या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
'क्लिन स्ट्रिट फूड हब' मध्ये शहरातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे व सार्वजनिक गजबजलेले स्पाॅट अशा ठिकाणी फूड हब उभारले जाणार आहे.
या ठिकाणी ठिकाणी आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, प्रसाधन गृह, खवय्यांसाठी पार्किंग, आकर्षक विद्युत योजना, साठवण जागा असणे अनिवार्य असणार आहे.
या हबसाठी केंद्र सरकारकडून एक कोटींचा निधी दिला जाईल.
हब उभारण्यासाठी केंद्र व राज्य 60 : 40 खर्च उचलेल.
या फूड हबचे व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणार्या व अनुभव असणार्या एनजीओ मार्फत केले जाईल.