Anuradha Vipat
महिलांना तणावाखाली राहण्याची कारणे केवळ वैयक्तिक नसून ती सामाजिक, कौटुंबिक आणि शारीरिक परिस्थितीशी जोडलेली असतात.
अनेक महिला घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतात. ज्यामुळे त्यांना विश्रांती मिळत नाही.
महिलांच्या शरीरात मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती यादरम्यान मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल होतात.
मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य आणि घरातील मोठ्या माणसांची काळजी घेण्याची मुख्य जबाबदारी आजही महिलांवरच असते.
कुटुंबाची काळजी घेताना महिला अनेकदा स्वतःच्या जेवणाकडे, झोपण्याकडे आणि छंदांकडे दुर्लक्ष करतात.
महिला अपेक्षा पूर्ण करण्याच्या दबावाखाली त्या सतत वावरत असतात.
घरखर्च चालवणे किंवा आर्थिक स्वावलंबनासाठी धडपड करताना येणारा ताण महिलांच्या मानसिकतेवर परिणाम करतो.