Team Agrowon
कार्नेशनसाठी कमीत कमी १० गुंठे क्षेत्रावरील लागवड फायदेशिर ठरते. पिकाचे आर्थीकदृष्ट्या फायदेशीर आयुर्मान तीन वर्षाचे असते.
लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी व मुबलक सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन निवडावी.
रंगानुसार जातीची निवड करावी. प्रामुख्याने लाल, पिवळा, पांढरा, गुलाबीतसेच दुरंगी फुलांना मागणी असते.
जमिनीचे निर्जंतूकीकरण केल्यानंतर गादी वाफ्यावर जोड ओळीत लागवड करावी.
झाडाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये पाण्याच्या माध्यमातून झाडांना मिळतात.
कार्नेशनचे फुलदांडे अतिशय नाजूक असतात.तसेच ते उंच वाढत असल्यामुळे त्यांना आधार द्यावा लागतो. आधारासाठी जाळीचा वापर करावा. एका वाफ्यासाठी कमीत कमी पाच जाळ्या लागतात.
फुलांची काढणी पेंट ब्रश म्हणजेच कळीतून फुल नुकतेच बाहेर पडताना करावी.