Aslam Abdul Shanedivan
मसाल्यांमधील असणारा एक पदार्थ आयुर्वेदानुसार आरोग्याला अनेक फायदे देणारा असून तो वेलची आहे
वेलची आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून याच्या नियमित सेवनाने शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते.
पण आयुर्वेदानुसार वेलची रात्री जेवल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी खाल्ल्यास चांगला फायदा मिळतो
झोपण्यापूर्वी २ ते ३ वेलची खाल्ल्यामुळे फ्रेश वाटण्यासह शरीर निरोगी राहाण्यास मदत मिळते
झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. अॅसिडिटीचा त्रास कमी होतो
झोपण्यापूर्वी २ ते ३ वेलची खाल्ल्यास शांत झोप लागते. तर तोंडातील दुर्गंधीची समस्या देखील दूर होते
रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास चयापचय सुधारून वेलचीमधील औषधी घटक गॅस, अॅसिडिटी, पोटदुखी आणि मळमळ या समस्या दूर ठेवण्यास मदत करते.