Anuradha Vipat
दैनंदिन वापरातील काही वस्तू कळत-नकळत कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतात.
जुन्या किंवा ओरखडे पडलेल्या नॉन-स्टिक पॅनमध्ये वापरले जाणारे काही घटक जास्त तापमानाला विघटित होऊ शकतात.
काही प्रकारच्या प्लास्टिकमध्ये 'बिस्फेनॉल-ए' सारखे घटक असू शकतात, जे अन्नामध्ये किंवा पाण्यात मिसळू शकतात.
घरात सुवासासाठी वापरल्या जाणाऱ्या काही एअर फ्रेशनर्समध्ये कृत्रिम सुगंध आणि रसायने असू शकतात
घरातील कीटकनाशकांमध्ये तीव्र रसायने असतात जी श्वसनमार्गासाठी त्रासदायक ठरू शकतात.
काही सौंदर्य प्रसाधनांमध्ये हानिकारक रसायने किंवा जड धातू असू शकतात जे त्वचेद्वारे शोषले जाऊ शकतात.
पॅकेटमधील चिप्स, इन्स्टंट नूडल्स किंवा प्रोसेस्ड मीटमध्ये अतिरिक्त मीठ, साखर, चरबी आणि प्रिजर्व्हेटिव्ह्ज असतात.