Team Agrowon
सरकारही ड्रोन वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांही या ड्रोन निर्मिती, प्रशिक्षण आणि अन्य तांत्रिक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.
एआयटीएमसी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड (एव्हिपीएल) या कंपनीनं राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी ड्रोन वापरला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला आहे.
ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्याशिवाय ड्रोन उडवण्यास परवानगी दिली जात नाही.
त्यामुळे देशभरात ड्रोनच्या प्रशिक्षणासाठी ओळख निर्माण करणाऱ्या एव्हिपीएल कंपनीनं प्रशिक्षणासोबच परदेशी प्लेसमेंटसाठी हा करार केला आहे.
पुढील तीन वर्षात ६५ हजार कृषी उद्योजक आणि ८० हजार प्रशिक्षणार्थी तयार करण्याचे उद्दिष्ट या कंपनीनं ठेवलं आहे. त्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी करार करण्यात आला असल्याचे एव्हिपीएलकडून सांगण्यात आले आहे.